Friday, January 24, 2014

तिरंगी ध्वजातील तीन रंग

तिरंगी ध्वजातील तीन रंगांचे अर्थ हे सांकेतिक आहेत. ते योग्य आहेत. धार्मिक दृष्टीने हिरवा मुसलमानांना आपला वाटणारा आहे. तर हिंदुंच्या हातातील फुलांची परडी - तांबडी लाल पुष्पे, हिरव्यागार दुर्वा, तुळशी, बेळ आणि पांढ़ऱ्या जाई जुई यांनी भरलेली असते. तेव्हा त्याला कोणताच रंग परका वाटत नाही. पांढ़रा रंग हा समतेचा द्योतक आहे. तेव्हा रंगा विषयी मतभेद नाही. 
- (1928 हिंदूसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर सावरकर) (रत्नागिरी पर्व) - सावरकर बाळाराव 

सध्या अनायासे जो राष्ट्रीय ध्वज होऊ पाहत आहे, त्यात शक्यतो व्यत्यय आणू नये या बुद्धीने आणि, सध्याच्या रंगाचा समुच्चय हे राष्ट्रीय ध्येय उत्तम प्रकारे व्यक्त करण्यास समर्थ असल्याने आम्हीं या रंगास संमती देत आहोत. शेवटी हे ही ध्यानात ठेविले पाहिजे की कोणते ही रंग घेतले तरी त्यात या तिरंगाप्रमाणे ही नाही ती अशी काही न्यूनता ही राहणारच. ती न्यूनता या तिरंगात एकंदरीने फारच अल्प आहे. हेच त्याचे विशिष्ट समर्थन होय. - (1928 श्रद्धानंद 2 ऑगस्ट)

No comments:

Post a Comment