Sunday, March 2, 2014

स्वदेशीचा अंगीकार करा - बहिष्कार करा चीनी सामानचा

20 जुलाई 1905ला ब्रिटिश शासनाने बंग-भंगची घोषणा केली आणि त्यांच्या या आव्हानाला भरपूर हिंमतीने स्वीकारत लोकमान्य टिळकांनी साम्राज्यवादी शक्तींना सडेतोड उत्तर देण्याकरिता परकीय वस्तुंचा बहिष्कार व स्वदेशी वस्तुंचा स्वीकार हे दोन सूत्र प्रामुख्याने दिले. वस्तुतः 'स्वदेशी" आणि 'बहिष्कार" एकच नाण्याचे दोन पैलू आहेत आणि म्हणूनच 7 आगस्ट 1905 पासून परकीय वस्तुंचा बहिष्कार व स्वदेशी वस्तुंचा स्वीकार चळवळ तीव्रतेने सुरु झाली. अरविंदघोष, रविंद्रनाथठाकुर, लालालजपतराय, विपिनचंद्रपाल या चळवळीच्या मुख्य उद्‌घोषकांपैकी होते. पुढ़ेजाऊन गांधींनी या स्वदेशी चळवळीला स्वातंत्र्याच्या लढ्‌याचा केंद्रबिंदु बनविला. या चळवळीच्या प्रभावामुळेच लोकमान्यांनी 'हिंदकेसरी"ची सुरुवात करुन हिंदीच्या प्रचार-प्रसाराची मोहिम राबविली. पंडित मदनमोहनमालवीय यांनी काशी हिंदुविद्यापीठची स्थापना केल्या नंतर हिंदी एक विषयाच्या रुपात सामील करुन 'अभ्युदय", 'मर्यादा", 'हिंदुस्थान" आदि पत्रांची सुरुवात एवं संपादन करुन हिंदीच्या प्रचार-प्रसाराची सुरुवात केली होती.
   
टिळकांच्या आवाहनावर देशात स्वदेशी व बहिष्कारची चळवळ चालवणाऱ्यांन मध्यें क्रांतीकारी सावरकरबंधुंचे विशेष स्थान आहे. 1 ऑक्टोबर 1905ला पुण्याच्या एका सभेत सावरकरांनी विद्यार्थीं समोर परदेशी वस्त्रांची होळी जाळण्याचा एक अद्‌भुत प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाच्या स्वीकृतीसाठी जेव्हां सावरकर टिळकांना भेटले तेव्हां त्यांनी एक अट टाकली की दहा-वीस वस्त्र जाळण्यानी काम चालायचे नाही. जर कां परदेशी वस्त्रांची होळी जाळायचीच आहे तर ढ़ीगभर वस्त्र जाळावे लागतील. या अटी प्रमाणेच सावरकरांनी 7 ऑक्टोबर 1905ला दहा-वीस नाही तर ढ़ीगभर परदेशी वस्त्रांनी भरलेल्या एका गाडीचीच होळी जाळली. सावरकरांची ही कल्पना इतकी विलक्षण होती की पूर्ण 16 वर्षानंतर 9 ऑक्टोबर 1921 मध्यें मुंबईत गांधींनी याच प्रकाराची परदेशी वस्त्रांची होळी जाळली.

गांधीत स्वदेशीची तळमळ इतकी जागृत होती की दक्षिण आफ्रिकेहून प्रकाशित होणारी आपली पत्रिका 'इंडियन ओपिनियन" (गुजराथी संस्करण 28डिसेंबर 1907) मध्यें पाठकांना 'पैसिव रेजिस्टंट", 'सिविल डिसओबिडियन्स" आणि अशाच कित्येक शब्दांकरिता समानार्थक गुजराथी शब्द सुचविण्यास सांगून त्याकरिता बक्षीस पण ठेवले होते. गांधींच्या या आवाहनाच्या प्रतिसादात त्यांना 'प्रत्युपाय, कष्टाधीन प्रतिवर्तन, कष्टाधीन वर्तन, दृढ़प्रतिपक्ष, सत्यनादर, सदाग्रह आदी शब्द जेव्हां मिळाले तेव्हां त्यांनी त्या सगळ्या शब्दांच्या अर्थांचे वेग-वेगळे विश्लेषण केल्या नंतर सदाग्रह शब्द निवडला आणि त्यास बदलून 'सत्याग्रह" केला. या विषयी गांधींनी तेव्हां लिहिले होते ''सिविल डिसओबेडियन्स" तर असत्याचा अनादर आहे आणि जेव्हां तो अनादर सत्य पद्धतीने असेल  तर तो "सिविल" म्हणविला जाईल. त्यांत देखील 'पैसिव"चा अर्थ सामावलेला आहे. म्हणून सध्यातरी एकच शब्द उपयोगात आणला जाऊ शकतो आणि तो आहे 'सत्याग्रह". गांधींनी पुढ़े हे देखील लिहिल होते की ः घाई करुन वाटेल तो शब्द देऊन टाकण्याने आपल्या भाषेचा अपमान होतो व आपला अनादर होतो. म्हणून असे करणे व ते पण 'पैसिव रेजिस्टंस" सारखे शब्द अर्थ देण्याच्या संदर्भात, एकप्रकारे 'सत्याग्रही"च्या संघर्षाचेच खंडन होते. 

सावरकरांनी तर 1893त वयाच्या दहाव्या वर्षीच 'स्वदेशी"चा उपयोग करा चा विचार प्रस्तुत करणारा फटका लिहिला होता. हे निर्विवाद्य आहे की टिळकांचा खूपच प्रभाव सावरकरांवर होता आणि कदाचित्‌ टिळकांच्याच कोठल्यातरी भाषणात सावरकरांनी ते ऐकिले असेल हे शक्य आहे. टिळकांनी तर 1898 मध्येंच पुण्यात स्वदेशी वस्तुंच्या विक्रीकरिता एक दुकान सुरु केले होते. त्यांच्या पण आधी बंगालच्या भोलाचंद्रनी 1874 मध्यें शंभुचंद्र मुखोपाध्यायांच्या 'मुखर्जीज मॅगझीन" मध्यें स्वदेशीची घोषणा दिली होती. 1870 मध्यें 'वंदेमातरम्‌"चा महामंत्र देणारे बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 1872त 'बंगदर्शन" मध्येें स्वदेशीची घोषणा दिली होती. वंदेमातरम्‌च्या उद्‌घोषाला या चळवळीच्या काळात महामंत्राचे रुप मिळाले व प्रत्येक भारतीय प्रत्यक्ष कृति से जोडला गेला.

उपर्युक्त उदाहरण याकरिता दिले गेले आहेत कि स्वदेशीचा विचार किती जुना आहे हे वाचकांस कळावे. तुम्हांस आश्चर्य वाटेल की हा विचार सगळ्यात आधी महाराष्ट्राचे निष्ठावान सामाजिक कार्यकर्ता गणेश वासुदेव जोशी (9-4-1828 ते 25-7-1880) यांनी दिला होता. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यांमुळे त्यांना 'सार्वजनिक काका" ही म्हटले जाऊ लागले होते. समाजसुधारक न्यायमूर्ती रानड्यां बरोबर सल्लामसलत करुन सार्वजनिक काकांनी 1872 मध्यें स्वदेशी चळवळीची मुहुर्तमेढ़ रोवली. त्यांनी 'देशीव्यापारोत्तेजक मंडळ" ची स्थापना करुन शाई, साबण, मेणबत्या, छत्र्या आदी स्वदेशी वस्तुंच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले व त्याकरिता आर्थिक झीज देखील सोसली होती. या स्वदेशी मालाच्या विक्रीकरिता सहकाराच्या तत्वावर आधारलेली दुकाने पुणे, सातारा, नागपूर, मुंबई, सुरत इ. ठिकाणी सुरु करण्याकरिता प्रोत्साहन दिले होते. स्वदेशी वस्तुंचे प्रदर्शन देखील आयोजित केले. त्यांच्या प्रयत्नांनी आगऱ्यात कॉटनमिल सुरु केली गेली होती. हेच कार्य सावरकरांनी 1924 ते 1937 रत्नागिरीत नजरबंदीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणाते केले होते.

12-1-1872ला त्यांनी खादी उपयोगात आणण्याची शपथ घेतली आणि आयुष्यभर पाळली. खादीचा वापर करणारे व त्याचा प्रचार-प्रसार करणारे तेे पहिले द्रष्टा देशभक्त होते. इतकेच नव्हें तर खादीचा पोशाखकरुन 1872 मध्यें दिल्लीदरबारात पण सार्वजनिक सभेकडून गेले होते. या सभेची स्थापना त्यांनी त्याकाळात पुण्यातल्या 95 प्रतिष्ठित लोकांना घेऊन सनदशीर पद्धतीने राजकीय कार्य करता यावे या करिता केली होती. जनतेची गाऱ्हाणी सरकार समोर प्रस्तुत करता यावी, सार्वजनिक करता यावी या  करिता 1970 मध्यें केली होती. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येऊ शकेल अशी ही सभा होती.

हे इतिहास कथन या करिता की ह्यापासून प्रेरणा घेऊन आज पुन्हा या स्वदेशीचा विचार स्वीकारण्याचा, रुजविण्याचा, त्याचा प्रचार-प्रसार करण्याचा व त्या करिता चळवळीची आवश्यकता तीव्रते भासत आहे। परदेशी वस्तुंचा बहिष्कार, स्वदेशी वस्तुंचा प्रयोग कांग्रेस किंवा कोणा विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा नाही तर तो संपूर्ण राष्ट्राचा संकल्प होता, आणि असावयास हवा. आज ग्लोबलायजेशनच्या काळात ओपन डोअरच्या नीतिचा फायदा घेऊन चीन आपले स्वस्त सामान पूर्ण भारतात पसरवित चालला आहे. आमचे उद्योग-धंदे नाश पावत आहेत. चीनचा इतिहास विश्वासघाताचा राहिला आहे तो आमची भुमी दाबून बसला आहे, सीमेवर समस्या निर्माण करित आहे इतकेच नव्हें तर आपल्या स्वस्त मालाचा ढ़ीग आमच्या बाजारातून लाऊन आम्हांस कित्येक पद्धतीने नुक्सान पोहोचवून राहिला आहे, आमच्या समोर नवनव्या समस्या उभ्या करण्या बरोबरच आम्हास आव्हान देऊन राहिला आहे. 

आज बाजारात जिकडे बघा तिकडे चीनी सामान दिसून राहिले आहे. घरगुती सामानापासून, लहान मुलांची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्सचे सामान, मोबाईलपासून आमच्या देवांच्या मूर्तीदेखील. हे सगळे चीनी सामान आमच्या स्वकीय उद्योगां द्वारा निर्माण केलेल्या उत्पादानांपेक्षा स्वस्त आहे. बाजाराकरिता उत्पादनापेक्षा स्वस्त आयात पडून राहिले आहे. पण यामुळे आमचे छोटे, मध्यम व कुटीरोद्योग नाश पावित आहेत. लाखो लोक बेकार होत आहेत. यावर चिंतन आवश्यक आहे। ही एक दुष्ट क्लृप्ति आहे. आज स्वस्त दिसणारे सामान उद्या खूप महागात पडणार आहे. इंग्रजांनी पण याच पद्धतीने स्वस्त माल प्राप्त करवून आधी व्यापार व मग देशाची दुर्दशा केली. आर्थिक गुलामीचा दूसरा टप्पा राजकीय गुलामी आहे.

स्वस्त चीनी सामानाची आम्हांस सवय होत चालली आहे. चीनी उद्योगांनी आमच्या उद्योगांना गिळंकृत करण्यास सुरवात करुन दिली आहे. याच ठळक उदाहरण म्हणजे लुधियानाचा सायकल उद्योग. आमच्याच पैशाने चीनी संपन्न तर आम्ही गरीब होत आहोत. विश्वासघाती व अरेरावी करणारा चीन आमचा हितैषी कधीच होऊ शकत नाही. स्वस्त मिळत आहे म्हणून चीनी माल विकत घेऊन  आम्ही चीनला दृढ़ करुन स्वतःची फसवणूक करित आहोत. आज कंपन्या, उद्योग घांवा करित आहेत पण कोणीही लक्ष देत नाही.

चीन बरोबर आमचा निर्यात कमी व आयात जास्त आहे. परिणाम आमचा पैसा त्याच्या जवळ जात आहे जो आमच्याच विरोधात उपयोगाता आणला जात आहे. पाहाणीप्रमाणे वीजेचे सीएफएल चा मुख्य कच्चा माल फॉस्फोरसकरिता आम्ही चीनवर अवलंबून आहोत. नुकतेच चीन ने किमत वाढ़वून आम्हांस हादरवून सोडले. औषध उद्योग बल्कड्रगकरिता पूर्णपणे चीनवर आश्रित आहे. दुरसंचार क्षेत्रचा 50% आयातवर आश्रित आहे त्यातल्या 62% वर चीनचा अधिकार आहे. वीजप्रकल्पाचे 1/3 बॉयलर, टरबाईन चीनहून आलेले आहेत. देशभरात चालेल्या प्रकल्पांत चीन कमी भावात कंत्राट घेऊन हळू-हळू आपल्या हालचाली वाढ़वित आहे जे पुढ़े जाऊन आम्हांस घातक सिद्ध होईल. त्याची कमी दर्जाची मशिनरी, जुनी होत चाललेली टेक्नॉलॉजी स्वस्त मिळते म्हणून आम्ही घेत चालले आहोत. जे उद्या आम्हांस नक्कीच डोईजड होणार. चीन आमच्याकडून कच्च्या मालाच्या रुपात उदा. रबर घेतो, कापूस घेतो व नंतर निर्माण केलेल्या मालाच्या रुपात आम्हालाच निर्याताच्या रुपात पाठवितो. जे ईस्टइंडिया कंपनीने केले तेच तर चीन पण करुन राहिला आहे.

आता आम्हाला पुन्हा एकदा टिळकांच्या स्वदेशीचा अंगीकार व परदेशी (म्हणजे चीनी)चा बहिष्कार च्या सूत्राचे अवलंबन करावे लागेल. आम्ही चीनीमालाचा बहिष्कार करुन आपल्या राष्ट्रधर्माचे पालन करावयास हवे. भारतीय उत्पादनांची विश्वासर्हता संपूर्ण जगात चीनपेक्षा जास्त आहे. आमचे प्राधान्य स्वस्त नाही तर 'सुरक्षितता, सन्मान, स्वाभिमान" चे असले पाहिजे.

आज देखील प्रासंगिक असल्या मुळे या लेखाचा समारोप मी बंकिमचंद्र चटोपाध्याय व भोलाचंद्रांच्या या कथनांबरोबर करित आहे - ''जो विज्ञान स्वदेशी असता तर आमचा दास असता, तो परदेशी झाला की आमचा स्वामी बनुन बसतो, आम्ही लोक दिवसे-दिवस साधनहीन होत आहोत. अतिथिनिवासात राहणाऱ्या अतिथिप्रमाणे आम्हीं लोक स्वामीच्या आश्रमात पडलेले आहोत, ही भारतभूमी भारतीयांकरिता एक विराट अतिथिनिवास झाली आहे."" ''या आपण सगळे लोक हा संकल्प घेऊ या की परदेशी वस्तु विकत घेणार नाही। आम्हांस नेहमी हे स्मरण राहिले पाहिजे की भारताची उन्नती भारतीयांकडूनच शक्य आहे.""

No comments:

Post a Comment