Saturday, March 31, 2012

''सगळ्या प्राण्यांना मैत्रीच्या दृष्टीने बघा."" यजुर्वेद

    हिंदूधर्म वेदांवर आधारित आहे. तो हे शिकवितो की मनुष्य तर मनुष्य प्रत्येक प्राण्याला पण मित्राच्या दृष्टीने बघा. म्हणजे प्राण्यां बरोबर चांगूलपणाचा प्रेमाचा व्यवहार करा. दूसरीकडे प्रेम, दया आणि (नाममात्र) सेवेचा उद्‌घोष करणारा ख्रिश्चन धर्म आहे. ज्याचे धर्मगुरु पोप जॉन पॉल खख यांचे हे वक्तव्य लक्षात घेण्याजोगे आहे. ''My Religion Takes You to Heavon, Yours to Hell."" (Organiser 9-1-05) विचारणीय हे आहे की खरोखरच देव इतका पक्षपाती आहे ! नक्कीच नाहीं. नैतिकतेच्या दृष्टीने हे विधान असहिष्णू आणि तिरस्करणीय आहे आणि ख्रिश्चिनिटीच्या खऱ्या तत्वाचे दर्शन यात होते. तर याच्याही दोन पाऊल पुढ़े याच सेमेटीक परंपरेचा धर्म 'इस्लाम" आहे जो स्वतःला 'दीन-ऐ-कामिल" (संपूर्ण धर्म) म्हणवितो. म्हणजे जगाच्या शेवटा पर्यंत यात कशाही प्रकारचा बदल शक्य नाही. कुराण भाष्य म्हणते ः''या धर्मास याच स्वरुपात कियामती पावेतो कायम रहावयाचे आहे व जगातील समस्त जाति समूहांकरिता हाच मार्गदर्शनाचा मीनार आहे."" (दअ्‌वतुल कुराण खंड 1 पृ.352) हा इस्लाम धर्म तर संपूर्ण मनुष्य जातिलाच ईमानवाले म्हणजे मुस्लिम आणि काफिर म्हणजे बिगर मुस्लिम या दोन भागात वाटून (कुराणाची सूर मुजादला मध्ये स्पष्टपणे माणसांना दोन विभागात विभागून काफिरांना ''शैतानाचा पक्ष (Hisb-Ush-Shaitan)"" (आयत 19) तर मुस्लिमांना ''"अल्लाहचा पक्ष (Hizbulla)"" (आयत 22) म्हटले गेले आहे.) मुस्लिमांना नेहमी करिता जन्नत (स्वर्ग) तर काफिरांना नेहमी करिता जहन्नम (नरकाग्नी) मध्ये राहण्याचा हुकूम सुनवितो. ह्या वचनांची कुराणात पुनः पुनः पुनरावृत्ती झाली आहे आणि हा हुकूम या करिता आहे की अल्लानी संपूर्ण जगाच्या सगळ्या जातीं करिता इस्लामला मार्गदर्शनाचा मीनार म्हटले आहे तरी पण काफिर इस्लामचा स्वीकार करावयास तैयार नाहीं.

    कुराणाचे निरीक्षण केल्यावर ज्ञात होते की कुराणाच्या एकूण 114 सूरहांपैकी 101 सूरहां (अध्यायां) मध्ये जन्नत आणि दोजख (नरक) मिळण्या संदर्भातील उल्लेख आढ़ळतात. कुराणाच्या एकूण 6239 आयातींपैकी सुमारे 1590 आयाती या संबंधीच्या आहेत. विश्वास बसत नाहीं ना !  तर पहा कुराणाच्या काही आयाती ज्यां मध्ये काफिरांना मिळणाऱ्या नरकाच्या शिक्षेचे वर्णन आहे ः''त्याच्या पुढ़े जहन्नम आहे आणि त्याला पीप-रक्त पाजले जाईल ज्यास तो एकेक घोट करुन पील परंतु घशाखाली सहजगत्या उतरवू शकणार नाहीं. मृत्यु प्रत्येक दिशेने त्याच्यावर ओढ़वेल परंतु तो मरु शकणार नाहीं आणि पुढ़े अत्यंत कठोर शिक्षेला त्याला तोंड द्यावे लागेल."" (इब्राहिम 16,17) ती कठोर शिक्षा कशा प्रकाराची असेल त्याचे वर्णन पुढ़ील प्रमाणे ः''लवकरच मी त्याला दोजख मध्ये दाखल करीन.....ना बाकी ठेवील आणि ना सोडील. त्वचेला भाजून टाकणारी."" (मुद्दस्सिर 26-29) (या आयाती उघडपणे सार्वजनिक ठिकाणी धर्मप्रचार करण्या करिता पै. मुहम्मदाला अल्ला कडून संदेश देण्या करिता जी पहली सूरह अवतरित झाली होती त्यातील आहेत.) ''जेंव्हा कधी असे होईल की त्यांच्या शरीराची त्वचा शिजून निघेल, तेंव्हा आम्हीं तिच्या जागी दुसरी त्वचा निर्माण करु म्हणजे ते (चांगल्या प्रकारे) शिक्षेची गोडी चाखतील."" (निसा 56) ''त्यांच्याकरिता जहन्नमचाच बिछाना असेल व वरुन पांघरुणही त्याचेच असेल."" (अअराफ 41)''त्यांच्याकरिता आगीचे पोषाख बेतविले गेले आहेत. त्यांच्या डोक्यावर उकळते पाणी टाकले जाईल ज्यामुळे त्यांच्या पोटात असलेल्या वस्तू व त्यांची चामडी गळून पडेल."" (हज्ज 19-22) कुराणात म्हटले गेले आहे की काफिरांना खायला जक्कूमचे (काटेरी) झाड दिले जाईल ''ते असे झाड आहे जे जहन्नमच्या तळा पासून उगते. त्याचे फळाचे घोस असे आहेत जणू सैतानाची मुंडकी ते याला खातील आणि उदर भरण करतील. मग यावर त्यांना प्यायला गरम पाणी दिले जाईल. मग त्यांचे परतणे जहन्नमच्या आगी कडे होईल.'' (अस्सफ्फात 62-68) अशा स्वरुपाच्या आयातींनी कुराण ओसंडून वाहत आहे.

    काफिरांचा नरकात जाण्याचा नियम इतका अचूक आहे की यातून पैगंबराचे पूर्वज, आई-वडील आणि वडिलां सारखे काका अबू तालिब ज्यांनी पैगंबराचा 40 वर्ष सांभाळ केला होता पण अपवादस्वरुप वाचू शकले नाही. या संबंधी हदीसपण आहेत आणि कुराणाची सूर तौबाची आयत 113 मध्ये स्पष्टपणे म्हटले गेले आहे की ः''पैगंबर आणि ईमान बाळगणाऱ्यास हे साजेसे नाही की त्यांनी अनेकेश्वरवाद्यांकरिता माफीची प्रार्थना करावी मग ते त्यांचे नातेवाईक का असेनात, जेंव्हा त्यांना स्पष्ट कळून चुकले आहे की ते जहन्नमवाले होत.""  कुराणात तर हे पण म्हणते की ''आणि यांच्यापैकी जो मरेल त्याची नमाज (जनाजा) तुम्ही मुळीच पढ़ू नका आणि ना कधी त्याच्या कबरीवर उभे राहा, कारण त्यांनी अल्ला व त्याच्या पैगंबराशी कुफ्र केले व अशा स्थितीत मेले की ते आज्ञा भंग करणारे होते."" (तौबा 84) या आयतीवरच्या दअ्‌वतुल कुराण खंड1च्या अधिकृत भाष्यात म्हटले गेले आहे की ः''कबरीवर उभे राहण्याचा" अर्थ कबरीवर जाऊन मृतासाठी क्षमा प्रार्थना करणे व दया-भावना प्रकट करणे होय. हा मनाई हुकूम ज्या प्रकारे दांभिकांबाबत आहे तद्‌वतच काफिर, अनेकेश्वरवादी व नास्तिकाकरिताही आहे; कारण जे लोक मरे पर्यंत काफिर राहीले ते अल्लाचे शत्रू होत आणि अल्लाच्या शत्रूंकरिता ईमान (श्रद्धा) बाळगणऱ्यांच्या मनात कोमल भाव असू शकत नाही."" (पृ.667) आणि असणे पण कसे शक्य आहे, का की कुराणच असे शिकविते की काफिर अल्लाच्या नजरेत ''अतिरेक करणारे (बकर 190) अनाचारी (बकर 205) कृतघ्न (हज्ज 38) वचनभंग करणारे (अनफाल 58) अप्रामाणिक व दुराचारी (निसा 36) ऐट करणारे  व घमेंड बाळगणारे (निसा 36) अत्याचारी (इमरान 57) गलीच्छ (बकर 28) अल्लाचा इंकार करणारे (अवज्ञाकारी) (इमरान 32)"" म्हणजे इस्लाम कुबूल न करणारे आहेत, म्हणून अल्ला पसंत करीत नाही.

    हाच अल्ला त्याच्या 'दीन-इस्लामला" मानणाऱ्या त्याच्या अनुयायांना म्हणजे मुसलमानांना आपले सदगुण रहमान व रहीम मुळे इतका उपकृत करतो की निःसंकोच, विशेष आढ़ेवेढ़े न घेता त्यांना सरळ जन्नतच्या (स्वर्गाच्या) देणग्या प्रदान करतो. या देणग्या कोणत्या, याची माहिती खूपच मजेदार आहे ज्यांचे वर्णन कुराणात भरपूर आहेत. स्वर्गाच्या आनंद-वार्ता सांगणाऱ्या काही आयाती निरीक्षणार्थ हजर आहेत ''त्याच्या करिता दोन (जन्नतच्या) बागा असतील. दोन्हीं बागा विपुल फांद्या बाळगणाऱ्या असतील.... दोन्हीं मध्ये दोन झरे वाहत असतील.... यात प्रत्येक मेव्याचे दोन प्रकार असतील ... ते अशा बिछान्यांवर तक्के लावून बसतील, ज्यांची अस्तरे जाड रेशमाची असतील आणि बागांची फळे खाली लोंबकळत असतील.... यात लज्जाशील नजरा बाळगणाऱ्या (हूर) असतील, ज्यांना यांच्या पूर्वी एखाद्या माणसाने किंवा जिन्नांने स्पर्श केला नसेल."" (रहमान 46 ते 56) पुढ़ील वर्णन बघा ''देणगी युक्त बागांमध्ये रत्नजडीत आसनांवर समोरासमोर तक्के लावून (बसले असतील) यांच्या जवळ अशी मुले ये जा करत राहतील जी सदैव त्याच अवस्थेत राहतील. प्याले आणि मद्य व वाहत्या मद्याचे प्याले घेऊन. ज्यामुळे न कैफ चढ़ावा आणि ना बुद्धि लयाला जावी. आणि मेवे जे पसंत करतील. आणि पक्ष्यांचे मांस जे त्यांना आवडत असावे आणि यांच्या करीता सुंदर नयनांच्या हूर असतील. जणू सुरक्षित ठेवलेले मोती. ..... यां (च्या पत्न्यांना) आम्हीं विशेषत्वाने उभारले असेल. आणि त्यांना कुमारीका बनविले असेल. प्रिय आणि समवयस्क."" (वाकेअ 12 ते 36) ''आणि सुंदर डोळ्यांच्या अप्सरांशी आम्हीं त्यांचा विवाह करुन देऊ."" (दुखान 54) सूर बकर च्या 25 क्रमांकाच्या आयाती मध्ये म्हटले आहे की ''या शिवाय या बागां मध्ये त्यांच्यासाठी पवित्र पत्न्या असतील आणि त्या मध्ये ते सदैव राहतील."" 

    संक्षेपात, इस्लामची संकल्पना मनुष्यांना दोन भागात 'काफिर आणि ईमानवाले (म्हणजे मुसलमान)" यां मध्ये वाटून आणि त्यांना नेहमी करीता प्रदान केल्या जाणाऱ्या नरक आणि स्वर्गाच्या जवळपास फिरत राहते. ज्यात काफिरांची भूमिका संसाराच्या निकृष्टतम प्राण्याची आहे. जसे की कुराणाच्या सूर अनफाल च्या 55 क्रं.च्या आयातीत म्हटले गेले आहे ''निःसंशय अल्लाह जवळ सर्वात निकृष्ट जनावर असे लोक होत ज्यांनी कुफ्र केले व ईमान बाळगले नाही ''या आयतीवर कुराण भाष्य म्हणते ''जो माणूस कुफ्रचा मार्ग पत्करतो तो बुद्धि व सुज्ञतेने काम घेत नाही. किंबहुना अंध बनतो व स्वतःला मानवतेच्या दर्जापासून खाली फेकून जनावरांपेक्षाही खालच्या थराला नेतो."" (द.कु.ख.1 पृ.607) केवळ भाष्यच नाही तर कुराण स्वतः अशा काफिरां बद्दल म्हटते ''हे बहिरे, मुके आणि आंधळे आहेत. आणि म्हणून काही समजू शकत नाही."" (बकर 171) ''यांच्या जवळ ह्रदये आहेत परंंतु त्या द्वारे ते ऐकण्याचे काम करीत नाही. त्यांच्या जवळ डोळे आहेत परंतु त्याद्वारे पाहण्याचे काम करीत नाही, त्यांच्या जवळ कान आहेत पण त्याद्वारे ते ऐकण्याचे काम करीत नाही. ते जनावरांसारखे आहेत. किंबहुना त्यांच्याहूनही अधिक भटकलेले."" (अराफ 179) कुराण इतक्यावरच थांबत नाही तर काफिरांना चेतावणी पण देते ''आणि जो कोणी इस्लामखेरीज दुसऱ्या कोणत्याही धर्माचा इच्छुक असेल तर तो त्याच्या कडून कधीही स्वीकारला जाणार नाही. आणि आखिरत मध्ये त्याचे मनोरथ विफल होतील."" (इमरान 85) कुराणात कियामतीच्या वर्णनात म्हटले आहे की ''अरेरे ! हा मोबदल्याचा दिवस आहे. हा तोच निर्णयाचा दिवस होय, ज्याला तुम्ही खोटे ठरवित होता. एकत्रित करा अत्याचारींना व त्याच्या सहकाऱ्रंना आणि त्यांना देखील, ज्यांची हे भक्ति (आराधना) करीत असत."" (तुस्सफ्फाति 20-23) 

    धर्म तर सगळ्यां करीता म्हणजे विश्वाच्या परमार्था करीता, विश्व कल्याणा करीता असतो, पण हा 'दीन-ए-इस्लाम" तर असा विलक्षण धर्म आहे की जो म्हणतो तर स्वतःला 'बंधुत्वाचा" धर्म पण त्याचे 'बंधुत्व" केवळ मुस्लिम समाजा पुरतेच. का की तो केवळ स्वतःच्या अनुयायिनांच ''उत्तम समाज (खैर-उम्मत)"" (इमरान 110) ''मध्यममार्गी समाज (उम्मते-वसत) (बकर 143)"" या आधारावर म्हणतो की ''हाच समाज सत्य धर्मावर कायम आहे."" (दु.कु.ख.1 पृ.225) स्वतःला 'अंतिम सत्य धर्म" आणि स्वतःच्या पैगंबरला 'अकिब" समजतो. ज्याच्या नंतर आता कोणताही नवा धर्म येणार नाही आणि कोणताही पैगंबर पण. जसे की कुराणातच म्हटले गेले आहे ''मुहम्मद अल्लाहचे रसूल (पैगंबर) आणि अखेरचे नबी होत."" (अहजाब 40) म्हणजेच दीन (इस्लाम धर्म) आता पूर्णत्वाला पोहचला आहे आणि आता कशाही प्रकारचा सुधार किंवा बदल शक्य नाही. म्हणूनच कुराण भाष्य म्हणते ''निखालस एके श्वरवादाचे स्वरुप असलेल्या इस्लाम धर्मा खेरीज इतर कोणत्याही धर्मा कडे किंचित मात्र लक्ष देणे ही ईमानास कंपित करते आणि समस्त धर्माच्या सत्य असण्या विषयीची कल्पना तर नितांत मार्गभ्रष्टता होय."" (द.कु.ख.3 पृ.1431) पुढ़े कुराण भाष्य म्हणते की ''समस्त धर्म त्याला आवडते आहेत मोठ्या धारीष्ट्याची बाब होय. आणि असा मनुष्य अतिशय दुराचारी व सर्वात मोठा अत्याचारी होय."" (1671) म्हणून ''जीवनाला धार्मिक व निधर्मी अशा दोन वर्गात विभागून अल्ला व त्याच्या प्रेषिताच्या कित्येक फैसल्यांना कौटुंबिक, आर्थिक व राजकीय जीवनाशी संबंधित आहेत रद्द बातील ठरविणे आणि सेक्युलर जीवन पद्धतिचा अवलंब करणे म्हणजे इस्लामशी उघड प्रतारणा करणे होय."" (1495) शेवटी भाष्य चेतावणी देते की ''सर्वधर्म समभावच्या सत्या व असत्यामध्ये कसलाच भेद ना पाळणाऱ्या दृष्टिकोणास मोठ्या मनमोहक शैलीत सादर करणारे जे लोक इस्लाम व कुफ्रचे मिश्रण तैयार करु इच्छितात त्यांनी तिळमात्र अशी अपेक्षा बाळगू नये की त्यांना कुराणाचे समर्थन लाभू शकेल."" (पृ.2396) आता वाचकांनी स्वतःच विचार करावा की सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी किती हास्यास्पद आणि पोकळ आहेत.

No comments:

Post a Comment