शौचकूप तर हवेच हवे पण मंदिर देखील हवेत
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री श्रीजयराम रमेश यांनी मंदिरांपेक्षा शौचकूप अधिक आवश्यक आहे असे वक्तव्य दिले होते. हे वक्तव्य दिल्या बरोबरच कित्येकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि त्यांचा विरोध सुरु झाला। तसे तर त्यांचे हे कथन सारपूर्णच आहे परंतु कां की हा मुद्दा श्रद्धेशी निगडित आहे म्हणून या प्रकारचे कथन जरा सांभाळून केले पाहिजे या प्रकारची टीका एक संपादकानी केली, ती योग्यच होती. परंतु, हे देखील तितकेच सत्यच आहे की या सत्यास कोणीही नाकारु शकत नाहीं की जगात उघड्यावर शौचेस जाणारे 60% लोक या हिंदुस्तानातच वसतात, देशाच्या अर्ध्या लोकसंख्येस शौचकूपांची सोयच प्राप्त नाही. आधी आपण शौचकूप म्हणजे काय हे समझून घेवू या- शौचकूप एक अशा सोयीचे नाव आहे जे मानवाचे मळ आणि मुतराची योग्य ती व्यवस्था करण्या करिता उपयोगात आणली जाते किंवा त्या युक्ति करिता देखील पण.
श्रीरमेश यांनी भारतीय रेल्वेला एक मोठ्या शौचकूपाचे नाव दिले आहे ते खरेच आहे. रेल्वेच्या प्रवासाच्या दरम्यान सकाळी-सकाळी जर आपण खिडकी बाहेर झाकून बघाल तर आपल्याला दर्शन होतील ते रुळाच्या किनाऱ्यावर शौचेस बसलेल्या लोकांचेच, हेच दृश्य बसनी प्रवासाच्या दरम्यान देखील बघावयास मिळते. शहरांमधून पण उघड्या जागांवर प्रातःकाळी शौचेस बसलेले लोक हातात टमरेल घेतलेले किंवा पाण्याची भरलेली बाटली घेऊन शौचेकरिता जागा शोधण्याच्या गडबडीत दिसून पडतील.
जरा विचार करा परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसमोर आमच्या लोकां बद्दल त्यांच्या मनात काय विचार येत असतील. किती घाणेरडी लोक आहेत ही. या देशातील लोक वाटेल तिथे घाण करित असतात आणि या बाबतीत दुमत होऊ शकत नाही की आम्ही नम्बर एकचे घाणेरडे म्हणवले जाऊ शकतो. आता तर मुंबई जी या देशाची आर्थिक राजधानीच आहे ला जगातल्या सगळ्यात जास्त घाण नगरात मोजले गेले आहे. वस्तुस्थिति तर ही आहे की जर कां आम्ही केवळ स्वच्छ राहवयास आणि स्वच्छता ठेवावयास शिकलो तर फक्त पर्यटन या उद्योगा मुळेच आमच्या येथील रोजगार समस्या सोडवली जाऊ शकते.
परंतु, स्वच्छतागृहांच्या कमतरतेच्या चालता हे कसे शक्य आहे? तसेच या करिता सगळ्यात आधी आम्हावयास आपल्या शौच निवृत्तिच्या सवयींना बदलाव लागेल. आमच्या येथे आज देखील उघड्यावर शौचेस जाण्याची मानसिकता ठेवणारे कांही कमी नाही. कांही लोक तर या समस्येस इतक्या हलक्याने घेतात की ते हे देखील म्हणवयास चूकत नाही की असे वाटते या देशात सगळ्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि आता एकच समस्या राहिली आहे आणि ती आहे शौचकूपांची.
हे पण एक कटु सत्य आहे की कमी होत चालेल्या जमीनी आणि त्यांच्या वाढ़त्या किमतींनी शहरात सगळ्यात जास्त कहर या मुतारींवरच आणलेले आहे. त्यांना तोडून पार्किंग, व्यापार आदिंकरिता उपयोगात आणले जाऊ लागले आहे व असे वाटते की या नेचरलकॉलपासून निवृत्त होण्याकरिता शहरात जागाच उरली नाही आहे. या मुळे लोक वाटेल तीथे उभे राहून लघ्वी करित असतात. परंतु, बायकांने काय करावे? बाहेरुन किंवा छोट्या गांवा-शहरातून कांही कामांनी सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे ज्यांस आपण फ्लोटिंग-क्लास देखील म्हणू शकतो च्या समोर पण हीच समस्या आहे. छोट्या शहरां किंवा गांवातल्या बसस्टैंडवर पण एकतर ही सोयच नसते किंवा असली तरी अत्यंत कमी आणि तेवढ़ीच घाण ज्यांत बायकांकरिता कांही जागाच नाही जणू कांही बायका प्रवासच करित नाही वा त्यांना या सोयींची गरजच पडत नाही. बस निघून ना जाओ म्हणून लौकरात-लौकर मोकळे होण्याच्या गडबडीत धावणारे प्रवासी दिसून पडणे या बसस्टैंडवर नित्याचेच असते. काय शौचकूपांची ही कमतरता भयानक नाही? चीन मध्येंतर बायकांनी या न्यूनतेच्या समाधानाकरिता ऑक्यूपाय वॉलस्ट्रीटच्याच धर्तीवर ऑक्यूपाय मॅन्स टॉयलेटचीच चळवळ सुरु करून दिली आहे इथे या चळवळीचा उल्लेख केवळ या विकट प्रश्नाचे गांभीर्य दाखविण्याकरिता केले आहे.
पाहणीनुसार कित्येक कार्यालयांमधून बायकांकरिता टॉयलेटची वेगळ्यांने व्यवस्थाच नाही आहे, कुठे-कुठे तर टॉयलेटच नाही किंवा असले तरी स्वच्छतेच्या उणीवेमुळे कित्येक बायकां यांचा उपयोग घृणेमुळे किंवा यूरीन इंफेक्शनच्या भीतीने करु इच्छितच नाही. मुंबई सारख्या जागेवर तर कित्येत बायकां सकाळी घरुन आटपून निघतात ते संध्याकाळीच घरी येऊन जातात. मुंबईच कां अन्य कित्येक नगरांमधून पण हीच समस्या विद्यमान आहे. सार्वजनिक शौचकूपांच्या उणीवेमुळे व अस्वच्छतेमुळे बायकांचा एक मोठा वर्ग यूरीन इंफेक्शन किंवा अन्य घातक संक्रमणांपासून पीडित आहे. खेड्यांची समस्या तर आणखिन पण गंभीर होत चालली आहे वाढ़त्या लोकसंख्येच्या दाबापासून खेडी सुद्धा सुटली नाहीत। पूर्वी गावांच्या जवळपास झाडझुडपांची जाळी असत पण वाढ़त्या लोकसंख्येमुळे आता ते पण नसल्या सारखेच होत चालली आहेत गावांतल्या बायकांना जेव्हां त्या शौचेस जात असत ते आडचे काम करित असत.
आयुर्वेदात सात वेगांचा उल्लेख आहे ज्यांना थांबवले न पाहिजे त्यात शौचनिवृत्ति सुद्धा आहे. शौच निवृत्त होण्याचे सुख चेहऱ्यावरच दिसून पडते. काय तुम्ही या सुखास कधीच उपभोगले नाही! आणि ज्यांच्या जवळ सोय नाही, ज्यांना सकाळ-संध्याकाळच्या नैसर्गिक पडद्याचा आश्रय घ्यावा लागतो आणि तो पर्यंत या आवेगास थांबवून ठेवण्याचे कष्ट आणि या आवेगापासून मुक्त होण्याच्या प्रयत्नांमध्यें झेलण्याकरिता बांधलेला होण्याची अपमानास्पद स्थिति आणि कष्टांची कल्पना विपरीत ऋतुमानांमध्यें- पूर इत्यादिना दृष्टित ठेवून करु तेव्हांच या शौचकूपांची आवश्यकता किती निकडची आहे व लोकांचे लक्ष या समस्येकडे आकर्षिले जावे याकरिता श्रीजयराम रमेश यांनी दिलेले स्फोटक, मन व बुद्धिला हिसडा देणाऱ्या कथनात काहींच आपेक्षार्ह नाही हे लक्षात येईल.
सुप्रीमकोर्टाने पण या समस्येवर आज्ञा दिली आहे आहे की सहा महिन्यांत सगळ्या शाळांमधून शौचकूपांची व्यवस्था केली जावी, विशेषः मुलींकरिता शौचकूप बनविले जावे. केंद्र सरकाराने पण लोकसभेत सांगितले आहे की एकलाखपेक्षा अधिक शाळांमध्यें शौचकूपांची सोय नाही. स्वच्छता नसण्यामुळे कित्येक पाण्यांने होणारे रोग आणि शौचसंबंधी रोग उत्पन्न होतात, पसरतात, जे रोगांच्या साथीपेक्षा कमी नाही. पूर्ण जगात या सोयीच्या नसण्यामुळे दरवर्षी 40लाख मुले डायरिया सारख्या रोगाने मरुन जातात.
तुम्हांस आश्चर्य वाटेल की 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आमच्या नेत्यांना शौचकूप पण एक समस्या आहे याचे भान सुद्धा नव्हते. ही एक समस्या आहे याकडे सगळ्यात आधी कोणी लक्ष वेधिले असेल ते गांधीजींनी. गांधीजी कांग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात सगळ्यात आधी शौचालयांच्या व्यवस्थेकडेच लक्ष देत असत की तेथे पाणी इत्यादिची योग्य व्यवस्था आहे की नाहीं. गांधीजींचे एक अनुयायी अप्पा पटवर्धन, गांधीजींने जे असहकार आंदोलन छेडले होते त्यापूर्वीपासून त्यांच्या आश्रमात राहून चूकले होते त्यांनीच 1928 मध्यें शेतकऱ्यांकरिता शौचकूपाचा प्रचार यशस्वीरित्या केला होता आणि 1930 मध्यें त्यांनी पूढ़े होऊन स्वतः मागून भंगीकाम न केवल स्वतःनी केले होते परंतु याकरिता बारा लोकांना तय्यार देखील केले होते. गांधीजी पण स्वतःचा संडास स्वतः स्वच्छ करित असत.
देशाचे पूर्वपंतप्रधान राहून चूकलेले चौधरी चरणसिंहने देखील या समस्येकडे लक्ष वेधिले होते. परंतु, त्यांचे कार्यकाळ फारच अल्प राहिले. इतक्या वर्षांपासून या समस्येकडे लक्ष वेधिले जात असून देखील परिस्थिती काय आहे तर - हे वरती वर्णिले गेले आहेच. अशा भयंकर परिस्थितीत जर जनतेचे ताबडतोब लक्ष ओढ़ले जावे याकरिता जर कां असे स्फोटक, कोणालाही हादरवून सोडणारे कथन मंत्री श्रीरमेश यांनी देऊन दिले तर त्यात असे कोणते संकट कोसळून पडले! आमच्या मताप्रमाणे तर ते प्रशंसेचे पात्र आहेत जे निर्मल भारतच्या मोहीमेत शौचकूपांच्या आवश्यकतेवर एवढ़ा जोर देऊन राहिले आहेत, याकरिता जोरदार प्रयत्न देखील करित आहेत. ज्यांस आजपर्यंत या देशात कोणीही केले नाही अपवाद आहे तो सुलभ इंटरनेशनलच्या श्रीबिंदेश्वरी पाठक व त्यांच्या स्वयंसेवकांचा आणि हो हेच ते श्रीबिंदेश्वरी पाठक आहेत जे एकटे श्रीरमेश यांच्या समर्थनाकरिता पुढ़े आलेत जेव्हाकी श्रीरमेश यांचा स्वतःचा पक्ष कांग्रेसने देखील त्यांच्या या कथनापासून स्वतःस दूर करुन घेतले होते.
कांकी आमचा देश धर्मप्रधान होण्याबरोबरच मंदिरांचा देश देखील आहे आणि आमच्या मंदिर या संकल्पनेत जैनमंदिर, शीखांचे गुरुद्वारे, ख्रिस्तींचे चर्च, मशीदी व अन्य धर्मांचे-संप्रदाय-पंथांचे धर्मस्थळ यांचा देखील समावेश होतो. श्रीरमेश यांच्या कथनाच्या मंदिराला पण याच संदर्भात बघितले तर अधिक योग्य होईल, कांकी भारत हिंदूबहुलतेचा देश आहे यामुळे हे स्वाभाविकच आहे की जेव्हा पण कांही उल्लेख होईल तर तो सगळ्यात आधी हिंदुंशीच संबंधित राहिल, यांस समझणे पण आवश्यक आहे. आता आम्ही आमच्या या मुद्यावर येतो की आम्हांस शौचकूपांबरोबरच मंदिर देखील हवेत पण ते मंदिर कसे असले पाहिजेत हाच खरा मुद्दा आहे.
वर्तमानकाळात मंदिर म्हणा किंवा धर्मस्थळ म्हणा अळंब्यांप्रमाणे फोफावत चालले आहेत. दिसली जागा की बनविले मंदिर मग तो एकाध्या गल्लीचा कोपरा असो किंवा कोणते मैदान, रस्ता इ. कुठे-कुठे तर लोकांच्या कंपाउंड मध्येंच संधिसाधून धर्मस्थळ बनवून दिले गेले आहे. जिथे धंद्या शिवाय आणखिन काहीही होत नाही. या धंदेवाईक लोकांनी तर नाल्यांवरच, कोणत्याही सार्वजनिक प्रसाधनाजवळ किंवा येथपर्यंत की उकिरड्यावर देखील मंदिर उभे केले आहेत. याकरिता एकाधा चबुतरा बनवायचा एकाध मूर्ति ठेवायची किंवा शेंदूर फासून दगड ठेवायचा की झाले आणि हळू-हळू लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलून मंदिर बनवायचे की झाली भंडाऱ्याच्या नावावर वर्गणी, पोटपाण्याची सोय.
श्रद्धेची आवश्यकता प्रत्येक मनुष्याला असते कोणत्यातरी मंदिरात गेल्या नंतर मूर्ति समोर हाथ जोडून उभे राहण्याने त्याला एक आत्मिक शांतिचा संतोष प्राप्त होतो, तो एक प्रकारची शक्ति प्राप्त करतो. समस्येचे निदान होईलचा विश्वास त्यास प्राप्त होतो. पण या धंदेवाईकांच्या मंदिरात हे कसे प्राप्त होऊ शकते. केवळ श्रद्धेचे क्षेत्र आहे म्हणून कोणालाही धर्माच्या नावावर काहीही करण्याची स्वीकृती कशी दिली जाऊ शकते. याकरिता तर हे हवे की समाजातल्या लोकांनीच अशा प्रकारच्या धार्मिक स्थळानां प्रोत्साहन दिले न गेले पाहिजे. मंदिराचे स्वरुप कसे हवे याचा पण तर विचार केला गेला पाहिजे. कोणत्याही चबुतऱ्यावर एक मोठासा दगड शेंदूर पोतून ठेवून देण्याने ते मंदिर होऊन जात नाही.
याच प्रकारे कोठे-कोठे तर घरातच मोठे मंदिर बनवून दिले गेले आहे जिथे दर आठवड्याला भंडारा-प्रसाद वितरण, आरती ती पण जोरा-जोराने जरी त्यामुळे जवळपास राहणाऱ्यांना त्रास कां होईना, वेळोवेळी होणारे यज्ञ, अखंड पारायण, प्रवचन आदि चालत राहतात ते पण रस्ते अडवून आणि कार्यक्रमानंतर जी घाण होते ती रसत्यांवर तशीच सोडून दिली जाते किंवा ड्रेनेजच्या हवाली केली जाते, ड्रेनेज चोक झाली तरी पर्वा नाही. कुठे-कुठे तर मध्य रसत्यावरच मंदिर स्थित आहेत किंवा रस्ते अडवून राहिले आहेत. या मंदिरांपैकी जास्तकरुन तर बेकायदेशीर आहेत ज्यांना अतिक्रमण करुनच बनविले गेले आहे. जर शास्त्रांमध्यें सांगितले गेले आहे की सगळ्यात मोठे पाप भूमि अतिक्रमण करणे आहे तर या मंदिरांना स्वीकृती कशी दिली जाऊ शकते.
जेव्हा विश्वनिर्मिती संबंधीचे तत्त्वज्ञान अस्तित्वात आले, श्रद्धाळु आले, श्रद्धा राहवी म्हणून त्याकरिता कर्मकांडांची निर्मिती झाली तेव्हा या श्रद्धा राहल्या पाहिजेत या करिता काही अभिनिवेश पण आले. यातूनच शिल्प, संगीत, चित्रकला, नाटक इत्यादी आले. परंतु, आज या कला ज्या मंदिरांमधून व्यवस्थितशील चालत असत त्या या नाममात्रच्या मंदिरांतून तर कुठेच दिसून पडत नाहीत. निश्चितच अशा मंदिरांची काय आवश्यकता आहे?
कांही मंदिर जे व्यक्तिविशेष किंवा समाज विशेष यांनी निर्मिलेले आणि संचालित केले जात आहेत ते तर निश्चितच या प्रकारच्या देखाव्यांना, शोभायात्रा काढून समस्या उत्पन्न करण्याच्या प्रवृत्ति, उत्सवांच्या नावावर फालतू खर्च करण्या पासून परावृत्त होऊ शकतात, समाजाच्या लोकांना जागरुक करुन याप्रकारच्या प्रवृत्तिंवर अंकुश लावू शकतात. आपला दृष्टिकोण विस्तीर्ण करुन समाजहिताकरिता सुधाराच्या दृष्टिने पाऊल पुढ़े टाकू शकतात. परंतु, याप्रकारचे मंदिर आणि याप्रकारच्या प्रवृत्तिवाले पण जरा कमीच आहेत. तरी पण आशेचे काही किरण दिसून पडतात, या वाढ़ाव्या.
वर्तमानकाळात उदारीकरण-वैश्वीकरण किंवा बाजारावाद म्हणाची जी लाट चालून राहिली आहे तीने प्रत्येक गोष्टीला बाजाराचे रुप देऊन दिले आहे त्यातून मंदिर कसे सुटू शकतात. आजच्या तारखेत जर कां सगळ्यात मोठा बाजार कसला असेल तर तो मंदिरांचाच आहे. जरा कल्पना करा देशात किती गांव आहेत, किती विभिन्न स्तरांचे नगर आहेत, महानगर आहेत आणि मग यांना नजरेत ठेऊन किती मंदिर या देशात आहेत आणि त्या मंदिरांमधून येणारी बिदागी, दान-दक्षिणेची कल्पना पण जर हातोहात करुन घेतली तर हा आकडा अब्जांमध्यें जातो. काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रांमधून छापून आले होते की एकट्या मुंबईतच साईबाबांचे किती मंदिर कायदेशीर-बेकायदेशीर आहेत आणि त्यांतून येणारी दक्षिणा कशाप्रकारे कोट्यवधी रुपयांची आहे तर हा मार्केट किती मोठा आहे याची कल्पना सहजच येते आणि येथे हे स्मरणात ठेवायला हवे की मंदिर ना नफा क्षेत्र आहे.
आणि भारताचा हा सगळ्यात मोठा र्स्वस्पर्शी क्षेत्र सर्वथा अनियोजित आहे व हाच मुख्य मुद्दा आहे. या क्षेत्रात आधुनिक म्हणावे असे व्यवस्थापनच नाही. प्रमुखतेने जी बिदागी, दान आदि येतात त्याचे व सुरक्षिततेचा प्रश्न. सुरक्षितते करिता आणिबाणीची व्यवस्था काय आहे? भाविक जो पैसा दानच्या रुपात परमेश्वराच्या सत्कार्याकरिता देतात त्याचा उपयोग त्यांच्या श्रद्धेचा सन्मान ठेऊन तितक्याच पवित्रतेने होतो की नाही? हा आस्थेचा, पवित्रतेचा क्षेत्र आहे तेव्हा यावर योग्य लक्ष देणारी, नियंत्रण ठेवणारी मशीनरी कोणती? हा एक अभ्यासाचा विषय आहे. या मशीनरीची गरज म्हणून देखील आहे कांकी, दानपेटीत दिलेले दान किंवा ताटात ठेवलेले पैसे कोठे जातात हे विचारण्याची हिंमत तर साधारण मनुष्य करुच शकत नाही. पण जर कां एकाधी ऍथारिटी असेल तर तो कमीतकमी तीस तक्रार करुन आपला पक्ष तर ठेऊ शकेल. जसे बैंक वा इंश्योरेंसच्या क्षेत्रात लोकपाल ज्यांना तक्रार करुन आपण न्याय मागू शकतो तसेच या क्षेत्रात देखील कोणी असावा असे तुम्हास वाटत नाही कां? जर कां असा विचारणारा कोणी असेल तर या क्षेत्रात येणाऱ्याला पण हे ठरवावे लागेल की तो 'फीलगुड" करिता येत आहे की श्रद्धा ठेऊन भाविकांना फायदा पोहचविण्याकरिता येत आहे.
आज आम्ही ग्लोबलाइजेशन-उदारीकरणाच्या युगातुन भ्रमण करित आहोत तेव्हा या व्यवस्थेस प्राच्य स्थितीत कसे ठेऊ शकतो. जुन्याकाळी मंदिरांची व्यवस्था राजेमहाराजे, सुभेदार इत्यादी करित असत वे जे पण कार्य संपादित होत असे ते परंपरागत पद्धतीने होत असे. तसेतर 1860पासून आजपर्यंत मंदिरांकरिता ट्रस्ट नोंदणी, त्याची व्यवस्था, येणाऱ्या दानाचे उपयोजन इ. करिता कायदा उपलब्ध आहे. परंतु, या क्षेत्रात पण आधुनिक व्यवस्थापनाची, टेक्नॉलॉजीची गरज आहे हा विचार पण तर झाला पाहिजे तो जरा कमीच आहे.
आजच्या या नव्या युगात जेव्हा नियामकांचे महत्व वाढ़त चाललेले आहे व ज्या क्षेत्रात नियामक (नियमनकर्ता) नाही तिथे किती अव्यवस्था, गोंधळ आहे हे जगजाहिर आहे. उदाहरणाकरिता रियल्टी सेक्टरलाच घेऊ या जिथे एकाद्या अथॉरिटीची मागणी खूप दिवसांनी पासून चालू आहे आणि आता सरकार देखील यावर लौकरच कारवाई करणार आहे. एक उदाहरण आणखिन आहे टेलीकॉम सेक्टरचे जिथे नियामक ट्रायला जेव्हा अधिकार कमी होते तेव्हा आम्हांस कोणत्या विकट प्रश्नांना सामोरी जावे लागले आणि आता अधिकार प्राप्ती नंतर परिस्थितीत किती बदल झाला आहे ते सगळ्यां समोरच आहे. तेव्हा धर्मस्थळांच्या क्षेत्रात पसरलेल्या गोंधळास थांबविण्याकरिता पण एकाद्या नियामक कां नको?
जर श्रद्धेच्या या क्षेत्रात अनियोजन, कुव्यवस्था म्हणा वा अव्यवस्थापनामुळे माजलेल्या गोंधळास ज्यास भ्रष्ट आचरण देखील म्हटले जाऊ शकते ला दूर करण्याकरिता, नियमनाकरिता या क्षेत्रात देखील एकाद्या नियामक कां म्हणून नको! जो भाविकांच्या हितांची, भावभावनांची कदर करेल, त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांना कोणत्या दर्ज्याची सेवा हवी आहे इ.चे लक्ष ठेवेल, त्यांच्या तक्रारींची दखल घेईल. ज्या जागेच व्यवस्थापन ग्राहकाभिमुख असते, जिथे बायका-मुल, वृद्धां बरोबर आदराचा, सहकाराचा व्यवहार होतो तिथे तुम्हास प्रसन्नता, आनंद प्राप्त होतो कां नाही! खरे सांगा काय एकाद्य मुजोर व्यवस्थापन कोणास आनंद देऊ शकते! अंतर्मनापासून सांगा की वर वर्णिलेल्या अव्यवस्थित मंदिरांत काय तुम्हास आत्मिक सुख-शांति मिळते, तर कां नाही यावर सविस्तर चर्चा व्हावी की त्या नियमनकर्त्याचे स्वरुप कसे असावे, त्याच्या नियंत्रण मंडळात प्रतिनिधींच्या रुपात सरकारी, असरकारी, धर्माचार्य, समाजसेवी इत्यादी कोण लोक असतील, किती सभासद असतील, त्यांची योग्यता इत्यादी. कां की मंदिरांतून येणाऱ्या भाविकांमध्यें सगळ्याच वर्गांची लोक खेळाडू, व्यापारी, उद्योगपती, सरकारी-प्रायव्हेट सेक्टरची लोक इ. येतात.
No comments:
Post a Comment